‘पाच लाखांत सुपारी घेतलीय, दहा लाख दे, अन्यथा तुझे काम करू’; धमकीने खळबळ
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना शुक्रवारी दुपारी धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. ‘तुझी पाच लाख रुपयांत सुपारी घेतली आहे. दहा लाख रुपये दे, अन्यथा तुझे काम करू,’ अशा शब्दांत धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी जंजाळ पोलीस ठाण्यात गेले असता, कॉलचे पुरावे उपलब्ध झाल्यानंतरच गुन्हा दाखल करू, असे पोलिस निरीक्षकांनी सांगितल्याचा दावा करण्यात येत आहे. आयफोनवर कॉल रेकॉर्डिंग झाले नसल्याने धमकीच्या कॉलचा ध्वनिमुद्रित पुरावा उपलब्ध नसल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याच्या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे.
दरम्यान, उपमहापौरांना धमकी देण्याचा प्रकार आणि तक्रार नोंदवण्याबाबत पोलिसांची भूमिका यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होणार आहेत.
No Comment! Be the first one.