धूत कंपनीजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; जखमींना घाटीत हलविले
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : चितेगाव-बिडकीन रोडवरील धूत कंपनीजवळ दुचाकी आणि अज्ञात वाहनाच्या अपघातात तिघे जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (२४ ऑक्टोबर) रात्री घडली. जखमींना तातडीने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघातात रोहित बनसोडे (वय ४१), गोरख जाधव (वय ४०) आणि नितीन सपकाळ (वय ४०, तिघेही रा. भवसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच गुरुकृपा रुग्णवाहिका सेवेने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचविले. दुचाकीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही
No Comment! Be the first one.