लोकार्थ प्रतिनिधी रमाकांत पोले
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे शेतातील सामाईक विहिरीच्या पाण्यावरून आणि शेतीच्या वादातून दुहेरी हत्याकांड घडले. रविवारी सकाळी पुतण्याने काका त्र्यंबक चोपडे आणि काकू मंगलाबाई चोपडे यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित आरोपी देवेंद्र चोपडे याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

No Comment! Be the first one.