दोघांकडून ३ पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे हस्तगत; एकूण २० काडतुसे जप्त
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शहरात अवैध अग्निशस्त्रांविरोधात सिडको पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईत आणखी मोठी अपडेट समोर आली आहे. अवैध अग्निशस्त्र प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांकडून ३ पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची संख्या ७ पिस्तूल आणि २० जिवंत राऊंडवर पोहोचली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम धर्मराज वाळके (वय २६, रा. सावित्री नगर, हिमायत बाग, उद्धवराव पाटील शाळेजवळ) याच्याकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. शुभम हा मिनरल वॉटर बॉटल निर्मितीचा व्यवसाय करतो.
तसेच कृष्णा विष्णू अधाने (वय २९, रा. गोळेगाव, ता. खुलताबाद) याच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले. कृष्णा याचा गोळेगाव येथे कपड्यांचा व्यवसाय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या दोघांकडून करण्यात आलेल्या नव्या जप्तीमुळे अवैध शस्त्रसाठ्याचा तपास अधिक महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. यापूर्वीच्या कारवाईसह आतापर्यंत एकूण सात पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या शस्त्रांचा स्रोत काय, ती कुठून आणण्यात आली आणि त्यांचा वापर कोणत्या उद्देशासाठी होणार होता, याचा तपास सिडको पोलीस करत आहेत.


No Comment! Be the first one.