केज तहसिल कार्यालयात दुष्काळ निवारण आढावा बैठक
लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे
केज तालुक्यातील पाणी टंचाई व दुष्काळ निवारणासाठी उपाययोजनांचे सूक्ष्मपणे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
दि. २५ ऑक्टोबर, रविवार रोजी दुपारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली केज येथील तहसील कार्यालयात पाणी टंचाई व संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार अशोक भंडारे, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, मुख्याधिकारी अजित ढोपे, तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संभाव्य पाणी टंचाईवर मात करीत दुष्काळ निवारणासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगून नागरिकांना दिलासा दिला. टंचाई निवारणासाठी आवश्यक उपाय योजनांचे नियोजन, विविध विभागां मधील समन्वय आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या.
बैठकीला केज तालुक्यातील मंडळ अधिकारी, सरपंच, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, मंडळ अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

No Comment! Be the first one.