मुख्य आरोपींच्या शोधासाठी वजिराबाद, स्थानिक गुन्हे शाखेची १२ पथके स्थापन
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे
नांदेड (म नेता)
मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांना मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना घडली असून मयत शेतकऱ्यांनी गळफास घेतलेला मृतदेह के एफ फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सापडल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान सदर प्रकरणात तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी १२ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्यावर माळकौठा येथे २५ आकटोबर रोजी पाहटे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी नांदेड शहरातील के एफ फायनान्स येथून १० हजार रुपये घेतले होते. एक महिन्यात ७० हजार रुपये झाले होते. सदर रक्कम वसूल करण्यासाठी के एफ फायनान्स कंपनीच्या भाडोत्री कर्मचाऱ्यांनी माळकौठा येथून गुरुवारी त्यांचे अपहरण करून नांदेड येथे आणले होते. के एफ फायनान्स कंपनीच्या भाडोत्री कर्मचाऱ्यांनी शेतकरी चंद्रकांत शिंदे यांना नांदेड येथील के एफ फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आणून भाडोत्री गुंडानी बेदम मारहाण करुन त्याला फायनान्स कंपनीच्या कार्यालयात डांबून ठेवले होते. २४ आकटोबर रोजी मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. सदर घटनेमुळे मयत शिंदे यांचे नातेवाईक के एफ फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोर एकत्र जमून आरडाओरडा करण्यास सुरुवात झाली. घटनास्थळी पोलिस अधिक्षक डॉ निलाभ रोहन, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने, पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या नातेवाईकांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हे दाखल करण्याची मागणी करुन मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
पोलिस अधिक्षक डॉ निलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वजिराबाद पोलिस ठाण्यात अपहरण व खूना दाखल केल्यानंतर मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. २५ आकटोबर रोजी पहाटे मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
बारा पथकांची स्थापना
के एफ फायनान्स कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वजिराबाद पोलिसांनी तीन जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, वजिराबाद पोलिसांचे बारा पथक तयार करण्यात आले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी ही पथके आरोपींचा शोध घेत आहेत. नांदेड शहरातील वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ, सिडको ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र अद्याप फक्त गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र मुळ आरोपीला अद्याप पकडण्यात आले नाही.
फायनान्स कंपनीच्या नावावरुन संभ्रम
शेतकऱ्यांचा मृतदेह आढळलेल्या फायनान्स कंपनीच्या नावावरुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत. नांदेड शहरातील एका वादग्रस्त फायनान्सचे नाव मयतांचे नातेवाईक व इतर पिडीत तक्रारदार घेत आहेत. परंतु पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये के एफ असे शाॅटकट नाव दिल्याने नावावरुन संभ्रम निर्माण होत आहे. दरम्यान प्रसिद्ध आणि वादग्रस्त नाव घेण्यास पोलिस देखील टाळाटाळ करीत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
No Comment! Be the first one.