लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे
केज : केज तालुक्यातील एका गावात वैद्यकीय सेवा करीत असलेल्या डॉक्टरला आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
केज तालुक्यातील बोरगाव येथे वैद्यकीय शिक्षणाची पदवी असल्याचे खोटे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावून ते बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस करीत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्या वरून दि. २७ ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, तालुका आरोग्याधिकारी आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल बाबजे दराडे, गोरख फड यांनी अत्यंत शिताफीने बोगस डॉक्टर विलास बन याला ताब्यात घेतले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
No Comment! Be the first one.