परभणी–मानवत महामार्गावर पहाटे पाचच्या सुमारास अपघात
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
परभणी ते मानवत या महामार्गावर बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास किन्होळा शिवारात पूलावरून इनोव्हा कार खाली कोसळल्याने सहा प्रवासी जखमी झाले आहेत.त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.
एमएच 12 डीवाय 0105 क्रमांकाची इनोव्हा कार या पुलावरून खाली कोसळली. या अपघातात पाच ते सहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान या महामार्गावरील पुलाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, पुलाजवळ आवश्यक दिशादर्शक फलक किंवा वाहनचालकांना सावध करणारी पुरेशी सूचना नसल्याने वाहनधारकांना पुलाचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे
No Comment! Be the first one.