विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयात डीजे चालक, मालक व ऑपरेटरची बैठक घेण्यात आली. बैठकीला ११५ डीजे चालक-मालक उपस्थित होते. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या.
यावेळी डीजे असोसिएशनने एका सेटअपमध्ये २ टॉप व २ बेस वापरण्याचे तसेच प्रेशर मिड साउंड व प्लाझ्मा स्पीकर न वापरण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पोलीस परेड ग्राउंडवर नॉईज लेव्हल मीटरच्या सहाय्याने साउंड सिस्टीमचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. गणेशोत्सव शांततेत आणि नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

No Comment! Be the first one.