पांडुरंग वानखेडे यांच्या हस्ते ओम प्रज्वलित; आठ दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जालना शहराचे आराध्य दैवत असलेल्या गांधी चमन येथील काळुंका माता संस्थानच्या वतीने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
नवरात्र महोत्सवानिमित्त आज काळुंका माता संस्थानच्या वतीने पांडुरंग वानखेडे यांच्या हस्ते ओम प्रज्वलित करण्यात आले. यावेळी काळुंका माता संस्थानचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा संगम साधत संस्थानच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे.
गांधी चमन परिसरातील काळुंका माता मंदिराला जालना शहरात विशेष धार्मिक महत्त्व आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, विविध धार्मिक उपक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी काळुंका माता संस्थानचे सचिव गोपाल कुडलिकर, भगवान मगर, भगवान तोडुळे, भगवान मैहत्रे, दिलीप पाऊलबुद्धे, धर्मा ईगळे, द्वारकादास वाघमारे, बाबासाहेब खांडेभराड यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविक उपस्थित होते.
नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने काळुंका माता संस्थानच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, भाविकांकडून या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
No Comment! Be the first one.