‘अन्न प्रतिबंधक कायदा झालाच पाहिजे’; पैठण गेट येथे जोरदार घोषणाबाजी
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : जागतिक अन्न दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर अन्न वाचवा समितीतर्फे पैठण गेट येथून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत समितीच्या सभासदांनी ‘अन्न प्रतिबंधक कायदा झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत कायदा लागू करण्याची मागणी केली.
या रॅलीत अन्न वाचवा समितीचे अनंत मोटाळे, दिलीप आसबे, सेवानिवृत्त एसीपी संपत शिंदे, चंद्रकांत राजेंद्र वाहुळे, वाजपेयी, कुलकर्णी साहेब, बनसोडे साहेब, प्रभाकर दिवटे, नागेश गवले, किरण शर्मा, सरिता घोडतुरे, पूजा सोनवणे यांच्यासह समितीचे अनेक सभासद सहभागी झाले होते.
अन्नाशी संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासह अन्न प्रतिबंधक कायद्याची मागणी या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी सभासदांनी विविध घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले.

No Comment! Be the first one.