लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील पैठण रोडवरील श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमासमोर शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी गोमांस तस्करीचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला. गौसेवकांच्या सतर्कतेमुळे संशयित वाहन अडवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच सुदर्शन महाराज कपाटे, अमित सिंह, मोहित त्रिवेदी यांच्यासह गौसेवक घटनास्थळी दाखल झाले. वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जप्त केलेल्या मालाचे स्वरूप आणि पुढील कारवाईबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे. नागरिकांनी कायदा हातात न घेता संशयास्पद प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन गौसेवकांनी केले


No Comment! Be the first one.