सेलू तालुक्यातील वालूर, हातनूर येथे केंद्रीय मंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
लोकार्थ प्रतिनिधी गुणीरत्न वाकोडे जिंतूर
जिंतूर: केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ना.श्री रामदासजी आठवले यांनी सेलू तालुक्यातील दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी हातनूर व वालूर परिसरातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान परिसरातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि शेतीसमोरील समस्यांची माहिती घेण्यात आली.
दुष्काळामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
या दौऱ्यामुळे परिसरातील दुष्काळग्रस्त नागरिकांच्या समस्या केंद्रीय प्रशासनापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
याप्रसंगी सेलचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत समवेत सेलूचे नगरसेवक श्री मनीष कदम, श्री बाळासाहेब काजळे,श्री निखील पहाडे,श्री देवानंद अंभोरे,श्री डॉ संजय लोंढे, पंचायत समिती सदस्य श्री गणेश मुंडे, वालूरचे ग्रामपंचायत सदस्य श्री सिद्धार्थ भालेराव, माजी पंचायत समिती सदस्य श्री इस्माईल अन्सारी, श्री राहुल जाधव,श्री सुनील धापसे श्री अर्जुन बावीसे, श्री दीपक बचिरे, श्री विशाल धापसे,श्री कपिल वाघमारे,श्री विक्रम मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




No Comment! Be the first one.