लोकार्थ प्रतिनीधी प्रवीण देशपांडे
परभणी -सेलू येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गौरव तराळ यांनी धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस धनादेशाच्या दुप्पट रक्कम, फिर्यादीस नुकसान भरपाई एका महिन्यात देण्याचे व ६ महिन्याच्या शिक्षेचा निर्णय दि. २१/१०/२०२६ रोजी सुनावला आहे.
याबाबत माहिती अशी, संजय जेमा राठोड रा. पाडी लंगे ता. सेलू जि. परभणी यांच्याकडून धनराज कन्स्ट्रक्शनचे मालक कैलास रामधन चव्हाण यांनी बांधकाम साहित्य पुरवठ्याबाबत १,५०,०००/- रुपयांचा माल घेतला होता. व त्या बदल्यात त्यांना धनादेश दिला होता.
संजय जेमा राठोड यांनी धनादेश बँकेत जमा केला असता खात्यात पैसे नसल्यामुळे धनादेश अनादर झाला. त्यामुळे संजय जेमा राठोड यांनी कैलास रामधन चव्हाण यांच्या विरुद्ध धनादेश न वटल्याप्रकरणी विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग सेलू येथे १३८ एन.आय.अॅक्ट अंतर्गत प्रकरण दाखल केले होते.
उपरोक्त प्रकरणात वादीचा पुरावा व वादीच्या वकिलांच्या युक्तीवादावरून विद्यमान न्यायालयाने आरोपीस धनादेशाच्या दुप्पट रक्कम ३,००,०००/- रुपये १ महिन्यात फिर्यादीस नुकसान भरपाई द्यावी. व रक्कम न दिल्यास ३ महिन्याची साधी कारावासाची शिक्षा तसेच ६ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सेलूचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गौरव तराळ यांनी सुनावली.
फिर्यादी संजय जेमा राठोड यांच्या वतीने अड. एल. एच. खोना यांनी काम पाहिले.
No Comment! Be the first one.