लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
जालना शहरातील मधुबन कॉलनी येथे नवरात्रोत्सवानिमित्त आमचे कार्यकर्ते आशिष चव्हाण च्या नेतृत्वात योद्धा ग्रुपच्या वतीने गेल्या नऊ दिवसांपासून दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रभागातील महिला, युवती, लहान मुले तसेच भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याने उत्सवाला उत्साहाचे वातावरण लाभले.
नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळाली. दांडिया खेळण्यासाठी महिला, युवती आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
या नवरात्रोत्सवाला सहकार्य करणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे, नागरिकांचे आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे योद्धा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. भविष्यातही सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
No Comment! Be the first one.