लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरु
कन्नड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विश्वमय रेणुका माता मंदिरातदसरा (विजयादशमी) निमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कन्नड शहर पोलीस स्टेशन तर्फे मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन रांग लावत भाविकांना सुलभ दर्शन घडवून आणले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
यावेळी संस्थानचे संस्थापक १०८ महंत देवदत्त गिरी महाराज संस्थेचे अध्यक्षविष्णू महाराज काळे सचिवशिवदत्त महाराज राजगुरू यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
दसऱ्यानिमित्त मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती.आपट्याची पाने प्रसाद,नारळ दुकान यामुळे संपूर्ण परिसराला मोठ्या यात्रेचे स्वरूप आले होते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी या उत्सवाचा आनंद घेतला.
देवीच्या दर्शनाने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
विश्वमाई चरणी हजारो भाविक लीन दसऱ्यानिमित्त मंदिरात भक्तांचा महापूर
Related Posts
सौरव दास, आशुतोष रांकाची हायकोर्टात धाव
October 21, 2026
No Comment! Be the first one.