लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे
मुदखेड ( म नेता)
आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन नागरिकांना अवाजवी व्याजदराने पैसे देणे, कर्जाच्या वसुलीसाठी दबाव टाकणे तसेच कर्जदारांची आर्थिक पिळवणूक करणे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी माळकौठा येथील चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूनंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. राज्यात अवैध सावकारीविरोधात कारवाईचा जोर वाढत असल्याने खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील माळकौठा येथील चंद्रकांत दगडू शिंदे यांनी के एफ फायनान्स या खाजगी सावकारांकडून १० हजार रुपये कर्ज घेतले होते . त्याच्या बदल्यात बारा हजार पाचशे रुपये १२ हप्त्यामध्ये कर्जाची परतफेड करायची होती . सप्टेंबर महिन्यात उचललेले सावकारी कर्जाच्या हप्त्यापोटी ३ ते ४ हजार रुपये भरले असल्याचे मुलगी रूपाली शिंदे यांनी सांगितले उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी वडील चंद्रकांत शिंदे यांना दि.२२ ऑक्टोंबर गुरुवार रोजी गावांतील मंदिराजवळ सावकाराच्या गुंडांनी उचलून नेऊन डांबून ठेवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे . यानंतर फायनन्सच्या कार्यालयांतच मृत्यू झाला असल्याची माहिती दि.२४ ऑक्टोंबर रोजी शनिवारी कळविण्यात आली आहे . याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून मृत्यूचे कारण पोलीस तपासातून उघड होणार आहे.
साहेब लेकरा बाळांचं काय माझ्या पोटचा गोळा गेला हो आता आम्ही कोणाच्या आधारावर जगायचं आई सरशाबाई शिंदे यांच्या आकर्षाने गाव तर सुन्न झालेच पोलीस प्रशासनालाही धक्का बसला . खाजगी कर्जाच्या वसुलीतून निर्माण झालेल्या अल्पभूधारक शेतकरी चंद्रकांत दगडू शिंदे वय ४० यांच्या मृत्युने खाजगी सावकारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . या प्रकरणाची पोलीस अधीक्षक डॉ निलोभ रोहन यांनी गंभीर दखल घेतली असून कुटुंबीयांची भेट घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधत बेकायदेशीर अवैध सावकारी दबाव , धमक्या , सक्तीची वसुली विरोधात कार्यवाहीचा बडगा उचलला असून तक्रार करण्याची आव्हान केले आहे
चंद्रकांत शिंदे यांच्या वडिलांचे निधन एका वर्षांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने दगडू शिंदे निधन झाले होते . यानंतर कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी चंद्रकांत दगडू शिंदे यांच्यावर आली होती . दोन एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने मुलगी दिपाली शिंदे यांचा विवाह झाला होता याशिवाय दहावीत शिकणारी रूपाली शिंदे , पाचवीत शिकणारा नागराज शिंदे , चौथीत शिकणारा युवराज शिंदे यांच्या शिक्षणाची जबाबदारी होती . अशा परिस्थितीत कुटुंबाचा आधारच हरपल्याने दि.२६ ऑक्टोंबर रोज रविवारी पहाटे ५ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून गावांतील प्रत्येक घरातील कुटुंबांना अश्रू अनावर झाले होते . पोलीस अधीक्षक डॉ. निलोभ रोहन यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन धीर देत प्रशासन पाठीशी असल्याचा विश्वास दिला . खाजगी सावकाराच्या नावाखाली नियमबाह्य व्यवहार , धमक्या किंवा बेकायदेशीर वसुली होत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करावी असे आव्हान केले . चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर खालसा फायनान्स कंपनी संबंधित खाजगी सावकारी व्यवहाराची तपासणी केली जात असून वसुलीची पद्धत संबंधित व्यक्तीशी झालेला पत्रव्यवहार याची पडताळणी सुरू करण्यात आली आहे . आई सरशाबाई शिंदे पत्नी ज्योती चंद्रकांत शिंदे , मुलगी रूपाली शिंदे , मुलगा नागराज, युवराज यांच्या आक्रोशाला न्याय मिळवून देण्यासाठी निष्पक्ष चौकशी करून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.नीलोभ रोहन यांच्याकडे केली आहे . यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख , युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, निर्भय बनो चे समन्वयक संदीप देशमुख , माध्यम समूहाची प्रतिनिधी मनोज आंबेगावकर , प्रभाकर जाधव , पप्पू जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कर्जाच्या चर्कव्युवात व्याजाची दाम दुप्पट वसुली
खालसा सावकारी कर्ज दहा हजार रुपये घेतल्यानंतर १२५०० रुपयांची परतफेड दर आठवड्यास करावी लागते परंतु आठवड्यास १२०० रुपये कर्जाच्या हप्त्याची परतफेड न केल्यास दर दिवसास चक्री दंड आकारला जातो . हप्त्याच्या दुसऱ्या दिवशी २४०० रुपये भरावे लागतात ,तिसऱ्या दिवशी ३६०० , चौथ्या दिवशी ४८०० रुपये याप्रमाणे वसुली केली जाते . चंद्रकांत शिंदे यांनी उचललेल्या ७००० रुपयांस ७५ हजार रुपये सक्तीच्या व्याजासाठी उचलून नेण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले . खाजगी सावकारांचे तालुक्यांतील प्रत्येक गावात जाळे पसरली आहे . माळकौठा गावातच जवळपास ५० कुटुंबीयांना चक्री व्याजाचे सावकारी कर्ज वाटप करण्यात आले आहे . दोन दिवसांत गावांतील अनेक कर्ज घेतलेल्या कुटुंबप्रमुखांनी पलायन केले आहे . सावकारी विरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून खाजगी कर्जदारांना पोलीस अधीक्षक डॉ. नीलोभ रोहन यांनी धीर दिला आहे.


No Comment! Be the first one.