जांबसमर्थ येथील मतदान केंद्र क्रमांक ३०५ वर केले मतदान
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. श्री. रविंद्र तात्या तौर साहेब व मा. सौ. किरणताई तौर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे जांबसमर्थ येथील मतदान केंद्र क्रमांक ३०५ वर त्यांनी मतदान केले. लोकशाही प्रक्रियेत मतदानाला महत्त्वाचे स्थान असून, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी रविंद्र तात्या तौर साहेब व किरणताई तौर यांनी जांबसमर्थ येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली.

No Comment! Be the first one.