जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन; जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड अध्यक्षस्थानी
लोकार्थ प्रतिनिधी गोपाल सातपुते
हिंगोली : सार्वजनिक दसरा महोत्सव समिती, हिंगोली आणि साहित्य सृष्टी फाउंडेशन, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता हिंगोली शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृह येथे हे कवी संमेलन रंगणार आहे. या संमेलनात राज्यातील नामवंत कवी, कवयित्री आणि साहित्यिक सहभागी होणार असून, साहित्यप्रेमींना दर्जेदार काव्यरचनांचा आस्वाद घेता येणार आहे. या कवी संमेलनाचे उद्घाटन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते होणार असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकुडे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, प्रा. नामदेव वाबळे, कलानंद जाधव, ज्येष्ठ कवी प्रा. विलास वैद्य, कवी गणेश येवले आणि थवा प्रकाशनचे संचालक गोडाती काळे उपस्थित राहणार आहेत.
नामवंत कवी-कवयित्रींची उपस्थिती
या संमेलनात प्रमुख कवी म्हणून प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील जळगावकर, प्रसिद्ध कवयित्री सिंधुताई दहिफळे, प्रसिद्ध कवी नारायण पुरी आणि प्रसिद्ध साहित्यिक बबन शिंदे सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी रतन आडे करणार असून, मान्यवरांचा परिचय कवी राजकुमार मोरगे करून देतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट जया करडेकर करणार आहेत.
राज्यातील अनेक कवींचा सहभाग
या निमंत्रित कवी संमेलनात राजकुमार नायक सवनेकर, वाकोडे मामा, राजाराम बनसकर, रतन आडे, दिलीप धामणे, राजकुमार मोरगे, बबन मोरे, डॉ. राधिका देशमुख, सुमन दुबे, शिवाजी कऱ्हाळे, मदन अंभोरे, लक्ष्मण सूत, प्रा. संध्या रंगारी, डॉ. निखिल नायक, महारुद्र घेणेकर, विजय गुंडेकर, श्रीरंग थोरात, व्ही.सी. पाईकराव, समाधान लोणकर, प्रा. मुरलीधर पंढरपूर, शिवचरण रटकलकर, शफी बोल्डेकर, प्रद्युमन गिरीकर, डॉ. अभय भरतीया, डॉ. वंदना काबरा, डॉ. संजय नाकाडे, गणेश आघाव, रघुनाथ घुगे, सविता देशमुख, पारिजात देशमुख, लीना जाधव, आबा पांचाळ, बालिका बरगळ, गंगाधर धामणे, विजय ठाकरे, गणेश मागणे, गायत्री दर्गा, संदीप पाटील, कैलास कावरखे, गौरी गुंडेवार, ज्ञानदा चौधरी, शिवदास पोटे, अशोक गुट्टे, नम्रता खिल्लारे, रघुनाथ पतंगे, विलास भालेराव, मायादेवी सरवदे, ज्योती पतिंगराव, या.शी. काटकर, चां.रा. आघाडे, प्रकाश भालेराव, संगीता देशमुख, कुसुम होडबे, दिगंबर जाधव, संगीता चौधरी, प्रदीप भालेराव, आरती पावडे, महासेन प्रधान, गजानन कष्टे, अक्षय बरडे, अहमद पठाण, साबेर बासमती, जमीर नजर, संगमेश्वर स्वामी, विजयकुमार ऐंगडे, बालाजी मोरे, प्रिया संगीत, रूपाली मोरे, दुर्गा पवार, कोंडीबा गायकवाड, अक्षय देशमुख, अमोल थिटे, नामदेव ठोके, बंडू पुरी आणि दत्ता पुरी यांच्यासह अनेक कवी सहभागी होणार आहेत या कवी संमेलनाचे संयोजन साहित्य सृष्टी फाउंडेशन, हिंगोलीचे अध्यक्ष कवी विजय गुंडेकर करीत आहेत. सार्वजनिक दसरा महोत्सव समिती आणि साहित्य सृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, साहित्यप्रेमी आणि नागरिकांना मराठी साहित्यविश्वातील विविध काव्यरचनांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकुडे यांनी केले आहे.
No Comment! Be the first one.