विजय देऊळगावकर
लाड़सावंगी : बैलपोळा सणानिमित्त मामाच्या गावी आलेल्या १२ वर्षीय मुलाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. स्वप्नील प्रमोद वाईळे (रा. गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना) असे मृत मुलाचे नाव आहे.
स्वप्नील हा मामासोबत बकऱ्या चारण्यासाठी शेतशिवारात गेला होता. यावेळी शेजारील शेतातील शेततळे पाहून त्याला पोहण्याचा मोह झाला. त्याने शेततळ्यात उडी मारली; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही बाब लक्षात येताच मामाने आरडाओरड केली. त्यानंतर शेजारील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत स्वप्नीलला शेततळ्यातून बाहेर काढले.
त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

No Comment! Be the first one.