छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसीतील युनायटेड जेनेटिक इंडिया कंपनीत काम करत असताना लोखंडी अँगल व पत्रा डोक्यावर पडून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी (१० सप्टेंबर) दुपारी घडली.अनिकेत गौतम सोनवणे (रा. महाजनवाडी, हरेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर, ह.मु. सावित्रीनगर, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
काम सुरू असताना लोखंडी अँगल व पत्रा अचानक खाली पडून अनिकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.या प्रकरणी करमाड पोलिसांनी कंपनीचे मॅनेजर, एचआर अधिकारी तसेच कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे
No Comment! Be the first one.