लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जालना : जालना जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंकुश आप्पा देशमुख यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या विचारांची आजच्या काळातही गरज असल्याचे मत व्यक्त केले. समाजात बंधुभाव, एकोपा आणि शांतता टिकवण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार पुढे नेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास जालना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शेख इब्राहिम, ज्येष्ठ पत्रकार अंकुश आप्पा देशमुख, बाबासाहेब सोनवणे, चंदा भागडिया, विभा लाखे, अंजली सापकाळ यांच्यासह काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याला उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
No Comment! Be the first one.