महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज तिसऱ्या माळेनिमित्त तुळजाभवानी मंदिर परिसरात साडेतीन शक्तिपीठांचा सुंदर आणि आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
या देखाव्यात आई येडेश्वरी, सप्तशृंगी माता, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी यांच्यासह देवींच्या विविध रूपांचे मनमोहक दर्शन भाविकांना घडत आहे. या आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसरातील धार्मिक वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून, देवीच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून जात आहे.
आई राजा उदो उदो!
तुळजाभवानी मंदिरात साडेतीन शक्तिपीठांचा आकर्षक देखावा; तिसऱ्या माळेनिमित्त भाविकांची गर्दी!
Related Posts
जिल्हाधिकार्यांच्या अचानक भेटीने एपीओ अडचणीत
October 15, 2026
सत्ताधारी – विरोधकांत रंगला कलगीतुरा
October 14, 2026
संभाजीनगरातील जाहिरात एजन्सींची ‘लोकार्थ’ला भेट!
October 14, 2026
शॉर्टसर्किट मुळे दहा एकर ऊस जळून खाक
October 14, 2026
No Comment! Be the first one.