हळद प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धनाला चालना देणार- उद्योगमंत्री उदय सामंत
लोकार्थ प्रतिनिधी गोपाळ सातपुते हिंगोली
हिंगोली:- वसमत येथील हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादन, प्रक्रिया व मूल्यवर्धनाला चालना मिळणार आहे. परिसरातील तीन जिल्ह्यांमधून सुमारे 25 लाख टन हळदीचे उत्पादन होत असल्याने त्यामुळे भविष्यात 100 कोटीचा हळदीवर प्रक्रिया करणारा फार मोठा उद्योग क्लस्टरच्या रूपाने उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट देत, महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रक्षेत्रावर लावण्यात आलेल्या हळदीच्या 61 वाणाची माहिती जाणून घेतली. तसेच शेतकरी प्रशिक्षण, शास्त्रज्ञाच्या माध्यमातून करण्यात येत असलेले विविध प्रयोग, प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धित उत्पादन संदर्भात माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रातील हळदीला जागतिक स्तरावर मागणी वाढावी, या हेतूने मोठ्या प्रमाणावर काम हाती घेण्यात आलेले आहे. नामदार उदय सामंत साहेब यांनी या केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादक शेतकऱ्यांसह हळद उद्योगालाही चालणा देण्यासाठी भविष्यात हळद उद्योग क्लस्टर ची निर्मिती करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संशोधन केंद्राचे अध्यक्ष नामदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, हरिद्रा संचालक मा. लक्ष्मीनारायण मुरक्या, संचालक संभाजी सिध्देवार, तालुका प्रमुख राजु चापके, अशोक चेपुरवार, श्री.प्रमोद भुसारे, शिवराज यशवंते, दत्ता पाटील पांगरीकर, विश्वनाथ महाराज पुसेगावकर, वैभव लोथे, अमोल बुद्रुक, केदार पाटील, खंडु नरवाडे तसेच हळद संशोधन केंद्राचे अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

No Comment! Be the first one.