लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात पावसाच्या अनियमिततेमुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. पळसगाव येथील एका शेतकऱ्याने उत्पादनाची आशा मावळल्याने तीन एकरांतील कापसाचे पीक उपटून फेकले आहे. एकरी ५० हजार रुपये खर्च करूनही यंदा एकरी ५० किलो कापूस मिळणे कठीण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दिवाळी तोंडावर असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
No Comment! Be the first one.