आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पाचोड पोलिसांत पॉक्सो, अत्याचार व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे पैठण,
पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात एका २६ वर्षीय आरोपीविरुद्ध पॉक्सोसह अत्याचार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचाळा, ता. पैठण येथील आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करून तिला आपल्या घरी बोलावल्याचा आरोप आहे. यानंतर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने पाचोड पोलीस ठाण्यात दि. १४ रोजी दाखल केली.
तक्रारीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी आरोपीविरुद्ध अत्याचार, पॉक्सो तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील करीत आहेत.
No Comment! Be the first one.