१७ लाख 29 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त : दोघांवर गुन्हा दाखल.
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे नांदेड
नांदेड (म नेता)
जिल्ह्यात अवैध सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला आणि जर्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पकडले असून या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण 26 लाख 29 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन आरोपींविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत होते. पहाटेच्या सुमारास पोलिस पथक पहेलवान टी हाऊस, नांदेड येथे असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, टायरबोर्डकडून चौफाळा मार्गे एका काळ्या रंगाच्या एम एच २६ बी ई ००७१ क्रमांकाच्या टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व जर्चाची वाहतूक केली जात आहे. पोलीस पथकाने तात्काळ दोन पंचांना सोबत घेऊन सकाळच्या सुमारास विणकर कॉलनी कमानी जवळ, भोपळे हॉस्पिटल समोर, इतवारा येथे सापळा रचून समोरून येणारा संशयित टेम्पो थांबवला. टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव सोहेल खान बाबर खान (वय 29 वर्षे, व्यवसायः चालक, रा. खडकपुरा, वजीराबाद, नांदेड असल्याचे सांगितले. पंचासमक्ष टेम्पोची झडती घेतली असता, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. चालक हा सदर मालाची विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.
सदर कारवाईमध्ये पोलीसांनी पंचासमक्ष 17 लाख २८ हजार रुपये किमंतीचा गुटखा व ८ लाख रुपयांचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो असा 26 लाख 29 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणात सोहेल खान बाबर खान (वय 29 वर्षे, व्यवसायः चालक, रा. खडकपुरा, वजीराबाद, नांदेड) (चालक) व मोहम्मद मतीन मोहम्मद मुजफर (रा. देगलूर नाका, इतवारा, नांदेड यांच्याविरुध्द इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड, सिध्देश्वर देशमुख व पोलीस अंमलदार बंडू कलंदर, बालाजी हिंगणकर, सदाशिव कदम, रेवननाथ कोरनुळे, हरप्रितसिंघ सुखई, शेख ईसराईल, साहेबराव जगताप, मारोती गिते यांच्या पथकाने केली आहे.
No Comment! Be the first one.