लोकार्थ मिडिया नागपूर :
नागपुरातील हुडकेश्वर परिसरात दहावीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाकडून कॉलेजात शिकणारी मुलगी प्रेग्नंट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
संबंधित तरुणी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असून तिचे वय 18 वर्ष 2 महिने आहे.
वैद्यकीय तपासणीत ती नऊ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.
तरुणीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
No Comment! Be the first one.