उत्पादक शेतकरी कैलास जाधव युवा शेतकऱ्याची यशोगाथा
लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे
केज:- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ज्या भागात सिंचनाचे शाश्वत साधन नाही, त्या भागात शेती करणे सोपे नाही. कधीकधी दुष्काळ पडतो आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जाते पण या आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा, एका युवा शेतकऱ्याने आपल्या मेहनतीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीला एका फायदेशीर व्यवसायात बदलले आहे.
केज तालुक्यातील साळेगाव येथील शेतकरी कैलास जाधव पाटील यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी पैकी चार एकर क्षेत्रात आद्रक लागवड करून दुष्काळी भागातील शेतकऱ्या समोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी पारंपरिक आणि बारमाही पिकांच्या ऐवजी कमी मेहनत आणि जास्त उत्पन्न देणारे पीक लागवड करून त्याला ठिबक सिंचन आणि योग्य मात्रेत खत आणि आंतरमशागत करून वेगळा प्रयोग केला आहे.
उसा ऐवजी आद्रक लागवड :- कैलास जाधव यांच्या कुटुंबात तिघा भावांची एकूण ४५ एकर जमीन आहे. पूर्वी ते उसाची लागवड करत असत, परंतु ऊसाला बारमाही पाणी लागते. तसेच त्याचा मिळणारा भाव यामुळे त्यांनी पीक पद्धती आणि पीक बदलण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी त्यांनी २०२० मध्ये त्यांनी थोड्या क्षेत्रात आद्रक लागवड सुरू केली होती.
ठिबक सिंचन आणि सौर ऊर्जेचा केला उपयोग :-
पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जाधव यांनी त्यांच्या शेतात एक विहीर आणि दोन बोअरवेल आहेत. या शिवाय, १६ एकर जमिनीवर ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यात आली आहे. यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकांना आवश्यक पाणी मिळेल याची खात्री होते.
२०२४ मध्ये, त्यांनी सरकारी कृषी योजने अंतर्गत आपल्या शेतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला. यासाठी त्यांना ९० टक्के अनुदान मिळाले. तसेच, त्यांना ठिबक सिंचनासाठी कृषी विभागाकडून ४० टक्के अनुदानही मिळाले. यामुळे विजेचा खर्च आणि शेतीचा खर्च कमी होण्यास मदत झाली.
यावर्षी ५०० क्विंटल आल्याचे उत्पादन अपेक्षित आहे:-
कैलाश जाधव यांनी १ जून २०२६ रोजी ४ एकर जमिनीवर आल्याची पेरणी केली. यावर्षी कमी पावसामुळे त्यांना सुमारे ५०० क्विंटल उत्पन्नाची अपेक्षा आहे. त्यांनी बियाणे, पेरणी आणि शेतजमिनीच्या तयारीवर अंदाजे २.५ ते ३ लाख रुपये खर्च केले. सध्या आल्याचा बाजारभाव प्रति क्विंटल सुमारे १७,००० रुपये असण्याचा अंदाज आहे. या पिकाची काढणी जानेवारी ते फेब्रुवारी २०२७ दरम्यान होईल. कैलास जाधव म्हणतात की, जर शेतकऱ्यांनी पाणी वाचवण्याचे तंत्र अवलंबले आणि पिकांमध्ये बदल केले, तर कठीण परिस्थितीतही शेतीला एक फायदेशीर व्यवसाय बनवता येऊ शकते.


No Comment! Be the first one.