लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे
नांदेड (म नेता)
तालुक्यातील वाहेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून १ कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात ८ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना अवैधरीत्या रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत अवैधरित्या नदीपात्रातून जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करीत असताना मिळुन आल्याने एकूण 25 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहेगाव गोदावरी नदीपात्र, अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, चार इसम हे इसम नदीपात्रातुन अवैधरीत्या रेती उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले. नमुद इसम हे पोलीसांना पाहून पळून गेले सदर ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून घटनास्थळावरुन एक जेसीबी, 25 लाख किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
26 ऑक्टोबर 2026 नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, काही इसम हे इसम नदीपात्रातुन अवैधरीत्या वाळू उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले. नमुद इसम हे पोलीसांना पाहून पळून गेले सदर ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून 3 मोठी लोखंडी बोट, 2 लहान लोखंडी बोटी, 2 इंजिन ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी वाहेगाव येथून 1 कोटी 26 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे.
याप्रकरणी वरील नमुद अज्ञात आरोपींविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक जाधव, पोलिस उपनिरीक्षक आनंद चव्हाण, पोलीस अंमलदार विजय कदम, भगवान टिपरसे, जीवन तेंलग, भिसे (सर्व नेमणुक नांदेड ग्रामिण) यांनी पार पाडली आहे.

No Comment! Be the first one.