बेलगाव येथील घटनेने शेतकऱ्यांना आर्थिक फटका; वीज यंत्रणेच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर
लोकार्थ प्रतिनिधी शरद मेहकर
लातूर : चाकूर तालुक्यातील बेलगाव येथे वीज वितरण यंत्रणेतील बिघाडामुळे उसाच्या पिकाला आग लागून दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी दुपारी ही घटना घडली.
मिळालेल्या वृत्तानुसार, गावातील वीज वितरण रोहित्राजवळ (डीपी) शॉर्टसर्किट झाल्याने अशोकराव वाकळे पाटील यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला. या आगीत किशनराव वाकळे पाटील यांच्या शेतातील उसाचेही नुकसान झाले. दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत करून आणि मोठा खर्च करून ऊसपीक जोपासले होते. मात्र, पीक हातात येण्याच्या काळातच आग लागल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून नुकसानीचा पंचनामा करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
No Comment! Be the first one.