लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने शहरासह परिसरातील आठ हॉटेल्स, बेकरी व औद्योगिक कॅन्टीनवर कारवाई केली आहे. अस्वच्छता, कीड प्रादुर्भाव, अन्न साठवणुकीतील त्रुटी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनांचे परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ निलंबित करण्यात आली आहेत.
या कारवाईत हॉटेल कार्निव्हल, हॉटेल निशांत पार्क, मिताली राजयोग, एफएस सर्व्हिसेस, राधाकृष्ण गृह उद्योग, टेबल ९ गार्डन रेस्टॉरंट, विद्या एन्टरप्रायझेस आणि ग्रीन प्युअर व्हेज यांचा समावेश आहे. संबंधित आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, प्रत्यक्ष फेरतपासणीत त्रुटी दूर झाल्याची खात्री झाल्यानंतरच परवाने पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा FDA चे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला.
No Comment! Be the first one.