लोकार्थ प्रतिनिधी सुशिल गायकवाड पूर्णा
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी शहरातील दोन महत्त्वपूर्ण पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नागरिक प्रकोष्ट शहराध्यक्षपदी भगवान पाटील, तर युवा मोर्चाच्या शहर सरचिटणीसपदी वैभव भायेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या शहरातील संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंडळ अध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकूर आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गंगाधर महामुने यांनी या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोघांचेही अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पक्षाने सोपविलेली जबाबदारी स्वीकारताना ज्येष्ठ नागरिकांशी समन्वय साधून त्यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुणांना संघटित करून पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविणे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी नगरसेवक प्रतिनिधी भगवान सोळंके, बालाजी कदम, महामंत्री निलेश कुऱ्हे, सरचिटणीस राम पुरी, उपाध्यक्ष पंकज राठोड, अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष गौस यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे पक्षाच्या शहरातील संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळणार असून, आगामी काळात पक्षविस्तारासाठी त्यांच्या कार्याचा लाभ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

No Comment! Be the first one.