MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; क्रांती चौकात हजारो विद्यार्थी एकवटले
छत्रपती संभाजीनगर : MPSC पेपरफुटीच्या विरोधात तसेच आपल्या न्याय्य हक्कांसाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारी (८ सप्टेंबर २०२६) आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. मोर्चासाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात हजारो विद्यार्थी एकत्र आले.
पेपरफुटीच्या घटनांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. परीक्षेतील पारदर्शकता कायम ठेवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी पुण्यासह छत्रपती संभाजीनगर आणि राज्याच्या इतर शहरांतील हजारो परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
या मोर्चासाठी क्रांती चौक परिसरात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न परीक्षार्थींनी केला. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
No Comment! Be the first one.