लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू –
कन्नड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत कन्नड येथील बारामती ॲग्रो कारखान्याने प्रतिटन ४५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय बळीराजा संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता गव्हाण बंद आंदोलनकरण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
यासंदर्भात तालुक्यातील गावोगावी शेतकरी संवाद बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या कसोटीने दुष्काळी परिस्थिती असतानाही ऊस पिकांस पाणी देऊन जगवले, वाढविले आहे. तरी जगात साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे व भावही उच्चांक आहे. आपल्याकडे ऊसापासून बऱ्याच प्रकारचे उत्पादने तयार करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे.
ऊस दर जाहीर झाल्यानंतरच ऊस तोडणीस परवानगी द्यावी.ऊसापासून मोठ्या प्रमाणावर साखर, मोलॅसेस (दारू साठी), बग्यॉच (भुसा), तयार होऊन त्यास मोठी मागणी आहे. तरी प्रति टन ४५०० रु. हमीभाव मिळावा. प्रत्येक ऊस शेअर होल्डर शेतकऱ्यांना दिवाळीत मोफत २५ किलो साखर देण्यात यावी.कारखान्यापासून ३० ते ४० कि.मी. अंतरावरील जे अतिरिक्त वाहतूक खर्च लावण्यात येतो तो लावण्यात येऊ नये.केंद्र शासनाकडून मिळणारे अतिरिक्त ५०० रु. बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावे. मागील वर्षी साखरेच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऊस बागायतदार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिटन ३०० रु. प्रमाणे जमा करावे. कारखान्याला मिळणाऱ्या नफ्यातून ऊस शेअर उत्पादक शेतकऱ्यांना शासन नियमाप्रमाणे रक्कम पावती अदा करण्यात यावी.
या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता गव्हाण येथे बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बळीराजा संघटनेने दिला आहे. या आंदोलनात कन्नड तालुक्यातील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.तालुक्यातील चिकलठाण येथे शेतकरी संवाद बैठक संपन्न झाली यावेळीसंस्थापक अध्यक्ष निवृत्ती डंख, जिल्हाध्यक्ष सुखदेव कदम, सामजिक कार्यकर्ते बाळासाहेब पवार, विक्रम चव्हाण, दत्तू जाधव,माजी सरपंच शिवाजी धनेधर,सलिम शेख, शैलेश वैष्णव, प्रगतीशील शेतकरी प्रताप चव्हाण यांच्या सह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Comment! Be the first one.