पावसाअभावी शेती संकटात; रब्बी हंगामासह शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
लोकार्थ प्रतिनिधी शरद मेहकरे
लातूर : साधारणपणे उन्हाळ्यात जमिनीला भेगा पडल्याचे चित्र दिसते; मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यातच जमिनीला मोठमोठ्या भेगा पडू लागल्याने दुष्काळाची भीषणता स्पष्ट होत आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने शेतशिवाराची अवस्था बिकट बनली असून, शेतीच्या भवितव्याबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, रब्बी पेरणीची अनिश्चितता आणि पाणी व चाऱ्याची टंचाई यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. जमिनीला पडलेल्या या भेगा केवळ कोरड्या मातीचे चित्र नसून, ग्रामीण भागातील गंभीर परिस्थितीचे वास्तव दाखवणाऱ्या आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि पीक नुकसानीबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
No Comment! Be the first one.