पुणे | प्रतिनिधी कैवल्य गांधी :गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पुण्यातील बुधवार पेठ परिसरात टाकण्यात आलेल्या विशेष धाडीत तब्बल ४ ट्रक संशयास्पद खवा आणि पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे.गुजरात आणि राजस्थानमधून बनावट साठा शहरात?गणेशोत्सवात मोदक, पेढे आणि मिठाईची मागणी वाढते. याचा गैरफायदा घेत परराज्यातून (विशेषतः गुजरात व राजस्थान) निकृष्ट दर्जाचा खवा आणि पनीर पुण्यात आणले जात असल्याची गुप्त माहिती एफडीएला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी बुधवार पेठेत पहाटेच्या सुमारास सापळा रचून ४ संशयित ट्रक रोखले. झडती घेतली असता अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाच्या स्थितीत साठवलेला खवा व पनीरचा मोठा साठा आढळून आला.
जप्त केलेल्या साठ्याचे नमुने तात्काळ लॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.साठा केला सील: अहवाल येईपर्यंत संपूर्ण माल एफडीएच्या ताब्यात सील करण्यात आला आहे.कडक कायदेशीर कारवाई: चाचणीत भेसळ सिद्ध झाल्यास एफएसएसएआय (FSSAI) कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.
“सणासुदीच्या काळात नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांची गय केली जाणार नाही. राज्यभरात ही विशेष मोहीम सुरूच राहील.”— तुकाराम मुंढे, आयुक्त (FDA)
नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन:सणासुदीच्या काळात मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक दुकानांनाच प्राधान्य द्यावे. पदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले आहे.
No Comment! Be the first one.