५३ वर्षीय व्यक्तीला अटक ३१.६५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह नशेच्या १० गोळ्या जप्त; मोबाईल आणि दुचाकीसह २ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. बुधवारी (दि. १७) सकाळी करण्यात आलेल्या कारवाईत एमडी ड्रग्ज आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी पकडले. या कारवाईत ३१.६५ ग्रॅम एमडी पावडर, नशेच्या १० गोळ्या, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण २ लाख १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शहरातील लोढेश्वर महादेव मंदिराजवळ, बुद्धीलाइन परिसरात संशयित व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सकाळी साडेसातच्या सुमारास सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत अनिल सूर्यवंशी (वय ५३, रा. घर क्रमांक १-१४-१००, प्रकाश पतंग मार्केट, लोढेश्वर महादेव मंदिराजवळ, बुद्धीलाइन, छत्रपती संभाजीनगर) याच्याकडून ९४ हजार ९५० रुपये किमतीची एमडी पावडर आणि ३६ हजार रुपये किमतीच्या नशेच्या Nitrazepam Tablets IP – Nitrosun 10 या दहा गोळ्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय मोबाईल आणि एमएच २० ईएम ७८६२ क्रमांकाची होंडा स्कूटीही पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहायक पोलीस निरीक्ष

No Comment! Be the first one.