पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २० ऑक्टोबरला मेळावा; पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे श्री संत भगवान बाबा यांच्या जन्मस्थळी असलेल्या भगवान भक्तीगडावर २० ऑक्टोबर रोजी पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
मेळाव्याच्या नियोजनासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत असून, वाहतूक व्यवस्था, प्रसिद्धी आणि गावनिहाय नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. गावागावांतील प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधून अधिकाधिक भाविकांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे यांनी पुढे सुरू ठेवली आहे. ऊसतोड कामगारांसह समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडणारे हे व्यासपीठ म्हणून मेळाव्याला महत्त्व आहे.
या पत्रकार परिषदेला दसरा मेळावा कृती समितीचे प्रवीण घुगे, महापौर समीर राजुरकर, सतीश नागरे, गजानन सानप यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
No Comment! Be the first one.