लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी)च्या तत्कालीन महासंचालकांसह कंत्राटदाराविरुद्ध शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्हीआयपी विश्रामगृहाच्या नूतनीकरणाच्या कामात नियमांना बगल देऊन तब्बल १ कोटी ९३ लाख ५५ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
तत्कालीन महासंचालक विश्वनाथ बाबुनाथ नाथ आणि कंत्राटदार राजेश चव्हाण यांनी संगनमत करून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आगाऊ रक्कम न देण्याचे निर्देश असतानाही कार्यालयीन आदेश तयार करून कंत्राटदाराला शासकीय निधी मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लेखाधिकारी सरला देशमुख यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर तपास करीत आहेत. पोलिसांच्या नोंदीनुसार, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
No Comment! Be the first one.