विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील शरणपुर येथील ‘शेळके मामा ढाबा रेस्टॉरंट’वर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला. तपासणीत स्वयंपाकघरातील अस्वच्छता, झुरळांचा वावर, व्हेज-नॉनव्हेज पदार्थांचे अयोग्य विलगीकरण, ड्रेनेजची दुरवस्था तसेच कर्मचाऱ्यांकडून अॅप्रन, हातमोजे व हेड गियरचा वापर होत नसल्याचे आढळले. सुधारणा नोटीस देऊनही परिस्थितीत बदल न झाल्याने ही कारवाई करण्यात आली. निलंबन काळात अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक व वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.



No Comment! Be the first one.