धनंजय लांबे – चीफ एडिटर लोकार्थ मिडिया
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध छेडलेल्या आंदोलनावरून देशभरात उलट-सुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांवर चिखलफेक सुरूच आहे पण, राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा देत आंदोलनात उतरलेल्या नेहा बोरा यादेखील सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. २०२०च्या दिल्ली दंगलीत हात असल्याचा आरोप असलेला शर्जिल इमाम आणि सीएएविरोधी आंदोलनात देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप असलेला उमर खालिद या दोघांच्या सुटकेची मागणी बोरा यांनी लावून धरली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्बन नक्षल म्हणून ज्यांना संबोधलं होतं, त्यांच्या पंक्तीत नेहा बोरा वरच्या स्थानी जाऊन बसल्या आहेत. आता तर एका अमेरिकन गायिकेनं, मेरी मिलबननं अमेरिकेतून या आंदोलनासाठी पैसा पुरवला जात असल्याचा दावा केला आहे. त्या मोदी यांच्या समर्थक मानल्या जातात. त्यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करून आपली भावना व्यक्त केली. त्या भारतीयांना उद्देशून म्हणतात, माझ्या तरुण देशभक्तांनो, तुमचे पंतप्रधान २५ वर्षांपासून भारताची सेवा करत आहेत. त्यात ते १२ वर्ष सलग तीनवेळ पंतप्रधान म्हणून निवडून आले. माझ्या देशातील विघटनकारी शक्तींपुढे ते झुकणार नाहीत. आता भारताला एका नव्या आवाजाची गरज आहे. हा आवाज भारतात जन्मलेला, वाढलेला आणि तिथेच शिक्षण घेतलेला असेल. जो पुढे येऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या विघटनकारी आंदोलनाचा शांततेने विरोध करेल. लोकशाही आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी नेहमीच एका प्रति-चळवळीची आवश्यकता असते. त्यामुळे भारतीय तरुणांनो पुढे या, आवाज उचला..”, असं आवाहनही गायिका मेरी मिलबन यांनी केलं आहे.
तिकडे सरकारची आणि भाजपची बाजू मांडण्यासाठी संबित पात्रा, सुधांशू त्रिवेदी हे नेहमीच आघाडीवर असतात. मात्र, आता दिल्लीतून अमित शहा, शिवराजसिंह चौहान, पियूष गोयल, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. गेले १४ वर्षं काँग्रेस एसआयआरमुळे हरलेली नाही, तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे हरली, असा घणाघात त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी आता सत्तांतराचीच हाक दिली आहे तर, अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान, गृहमंत्री यांचा एकेरी उल्लेख करत देशात त्यांनी आणिबाणी लागू केल्याचा कांगावा केला आहे. राहुल गांधी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून आगळीक केली आहे तर, केरळ काँग्रेसनं सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याचीच मागणी करून टाकली आहे. एकीकडे काँग्रेसचं राज्य असलेल्या कर्नाटकात एसआयआरविरोधी आंदांलन चिरडून टाकलं जात आहे तर हाच पक्ष दिल्लीत एसआयआरविरोधी कसं काय करतो, असाही प्रश्न लोक विचारत आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून सरकारचे समर्थक आणि विरोधक यांच्यातला कलगीतुरा ऐन नवरात्रात चांगलाच रंगला आहे. आता निवडणुका झाल्या तर, देशात भाजपला मोठा फटका बसेल, अशी भविष्यवाणीही कोण्या राजकीय नेत्यानं पेरून टाकली आहे.
तुम्हाला याविषयी काय वाटतं? नक्की व्यक्त व्हा. त्यासाठी तुमचं हक्काचं चॅनल लोकार्थ आहेच!
सत्ताधारी – विरोधकांत रंगला कलगीतुरा
Related Posts
सत्ताधारी – विरोधकांत रंगला कलगीतुरा
October 14, 2026
संभाजीनगरातील जाहिरात एजन्सींची ‘लोकार्थ’ला भेट!
October 14, 2026
शॉर्टसर्किट मुळे दहा एकर ऊस जळून खाक
October 14, 2026
कॉकरोचनंतर आता मख्खी जनता पार्टी; लाखो समर्थकांची साथ!
October 14, 2026
No Comment! Be the first one.