विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या ब्रिजवाडी येथील शाळेच्या इमारतीतील प्लास्टरचा भाग कोसळून पाचवीतील विद्यार्थिनी अश्विनी संतोष बल्लाळ (रा. ब्रिजवाडी) हिच्या डोक्याला दुखापत झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१० सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत वर्ग सुरू असताना इमारतीच्या छताचा प्लास्टरचा काही भाग अचानक खाली कोसळला. यावेळी अश्विनीच्या डोक्याला प्लास्टरचा भाग लागल्याने ती जखमी झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

No Comment! Be the first one.