विजय देऊळगावकर
गंगापूर : गंगापूर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस अंमलदार शकील सत्तार शेख (वय ४०) याला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. अटक वॉरंटनुसार होणारी कारवाई टाळण्यासाठी आरोपी शेख याने संबंधित व्यक्तीकडे सुरुवातीला ५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीनंतर ३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पथकाने सापळा रचून गुरुवारी (१० सप्टेंबर) रात्री गंगापूर पोलीस ठाण्याच्या आवारातच शेख याला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस ठाण्याच्या आवारात एकच खळबळ उडाली. एसीबीकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

No Comment! Be the first one.