
याहोडिन (युक्रेन) : युक्रेन-पोलंड सीमेजवळ रशियन ड्रोनने एका रेल्वेला सोमवारी लक्ष्य केले. या हल्ल्याच्या काही वेळापूर्वी ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि युरोपमधील उच्चपदस्थ सुरक्षा अधिकारी याच रेल्वेमार्गावरून पुढे गेले होते.
याहोडिन येथे झालेल्या या ड्रोन हल्ल्यात रेल्वेच्या इंजिनचे नुकसान झाले. मात्र, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. कीव्ह येथे झालेल्या एका परिषदेत सहभागी झाल्यानंतर परतीच्या प्रवासात जॉन्सन आणि इतर युरोपीय देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तसेच ब्रिटनचे जोनाथन पॉवेल, वेगळ्या रेल्वेगाडीतून याच रेल्वेमार्गावरून गेले होते.
रशियाने पश्चिम युक्रेनमधील “रेल्वे पायाभूत सुविधांवर” हल्ला केल्याचे म्हटले आहे. मात्र, युक्रेनची सरकारी रेल्वे कंपनी उक्रझालिझनित्सियाने म्हटले की, “या ड्रोनचे लक्ष्य राजनैतिक प्रतिनिधींची रेल्वे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
हल्ल्याच्या वेळी याहोडिन स्थानकावर दुसऱ्या रेल्वेत माजी सीआयए प्रमुख डेव्हिड पेट्रायस उपस्थित होते. त्यांनी हा प्रकार भयावह असल्याचे म्हटले. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पेट्रायस म्हणाले, “युक्रेनमधील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रूर नेत्याचे हे कृत्य आहे.”
युक्रेनची सरकारी रेल्वे कंपनी उक्रझालिझनित्सियाने म्हटले आहे की, “या ड्रोनचे लक्ष्य राजनैतिक प्रतिनिधींची रेल्वे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
हल्ल्याच्या वेळी याहोडिन स्थानकावर दुसऱ्या रेल्वेत माजी सीआयए प्रमुख डेव्हिड पेट्रायस हेही उपस्थित होते. त्यांनी हा प्रकार भयावह असल्याचे म्हटले.
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पेट्रायस म्हणाले, “युक्रेनमधील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खरोखरच क्रूर नेत्याचे हे कृत्य आहे.”
उक्रझालिझनित्सियाने एका निवेदनात म्हटले की, “रशियन हल्ल्यांचा सतत धोका लक्षात घेऊन वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. त्यामुळे राजनैतिक प्रतिनिधींची रेल्वे नियोजित वेळेपेक्षा लवकर स्थानकातून रवाना झाली होती.”
हल्ल्याच्या वेळी याहोडिन स्थानकावर दुसऱ्या रेल्वेत माजी सीआयए प्रमुख डेव्हिड पेट्रायस हेही उपस्थित होते. त्यांनी हा प्रकार भयावह असल्याचे म्हटले.
No Comment! Be the first one.