लोकार्थ प्रतिनिधी पंकज पवार अंबड
वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या अंबड शहर शाखा कार्यालयाने विशेष मोहीम राबवत ५४ जणांविरुद्ध चार स्वतंत्र फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण २१ हजार ३७ युनिट वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले असून, त्यातून महावितरणचे ४ लाख ८६ हजार ३२५ रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
या प्रकरणी सोहेल जाहीर शेख, युसुफ हिराजी बागवान, शेख मीना शेख मुन्ना, नवनाथ निवृत्ती घनाडे, रामा मोरे अंकुश, विठ्ठल रामा उबरे, मनोहर मारोतराव शिंदे, केदार बबन गुंजे, भागवत शिवाजी शिंदे, योगेश ताराचंद राठोड, रमेश गुलाब राठोड, बंडू शंकर आडे, विनायक गंगा राठोड, संदीप शंकर आडे, आकाश सुभाष राठोड, विलास काशीनाथ राठोड, सुनील प्रेमसिंग जाधव, अनिल अर्जुन राठोड, अनिल शिवलाल जाधव, सचिन किसन राठोड, गौरव मोहन जाधव, दत्ता अंकुश आडे, राहुल राजू राठोड, राजेश कान्हेराम जाधव, सुभाष वन्सीराम राठोड, शिवलाल घणा राठोड, मच्छिंद्र कान्हेराम राठोड, दादू खडसे, खदीर गुलाम जिलानी, जहर सादेक हाश्मी, मनोज सवनीस, हाजी बाबामियाँ कुरेशी, राजू अहमद मिर्झा, महमूद नांदवाले, राजू अजमद मिर्झा, युनूस इस्माईल शेख, वसीम जमाल शेख, खिजर सादेक हाश्मी, भागवत खुशालराव बर्डे, पांडुरंग दादू सातपुते, सूर्यकांत रघुनाथ अमीनपुरे, सुनील आसाराम दहिवाळ, संजय बाबू जाधव, बालदेव देवचंद बामणावत, भाऊसाहेब पुराजी राठोड, रामराव घोडेराम जाधव, पांडुरंग जगनीश आढे, जनार्धन सुखलाल चव्हाण, गोविंद सुखलाल चव्हाण, विलास घोडेराम पवार, सुरेश आबादास जाधव, सोपान प्रकाश जाधव, महमद नांदवाले व रियाज मिर्झा या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वीजवाहिन्यांवर अनधिकृत आकडे टाकून वीज घेणे, मीटरमध्ये छेडछाड करणे किंवा अन्य अनधिकृत मार्गांनी वीज वापरणे हा कायद्याने दंडनीय प्रकार आहे. अशा प्रकारांमुळे महावितरणच्या महसुलाचे नुकसान होण्याबरोबरच वीजयंत्रणेवरील भार वाढणे, वीजपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणे आणि विद्युत अपघातांचा धोका वाढणे अशा समस्या उद्भवतात. वीजबिल नियमित भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा, तसेच वीजचोरीमुळे होणारे आर्थिक नुकसान रोखता यावे, यासाठी महावितरणकडून अनधिकृत वीजवापराविरोधात ही मोहीम राबवण्यात आली. जालना-२ विभागाचे कार्यकारी अभियंता विकास आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड शहर शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता लक्ष्मण पुंडे यांच्या नेतृत्वाखाली अंकुश दुनगहू, सोमनाथ मुळे, गजानन गोदे, संदीप गाडेकर, पांडुरंग रणमाळे, संतोष राठोड, देविदास काळे, वाल्मीक सांगोळे व एजाज खतीब या व इतर कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली.

No Comment! Be the first one.