विझविण्याचा प्रयत्न करीत असताना शेतकरी जखमी
लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे
केज:- केज तालुक्यातील सातेफळ येथील सातेफळ येथील एका शेतकऱ्याचा पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे. डोळ्या देखत ऊस जळत असताना विझविण्याचा प्रयत्न करीत असताना शेतकरी देखील भाजून जखमी झाला आहे.
दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० च्या सुमारास सातेफळ ता. केज येथील संजीवन नामदेव कांदे यांचा सातेफळ शिवारातील पाच एकर ऊस जळून खाक झाला. यावेळी ऊस विझविण्यासाठी गेलेले शेतकरी संजीवन कांदे हे आग विझविण्याचा प्रयत्न करीत असताना ते आगीत भाजून जखमी झाले आहे. या आगीची कल्पना मिळताच केज नगर पंचायतीचे अग्निशामक दलाच्या बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. ही आग विद्युत तारांच्या स्पार्किंगमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.


No Comment! Be the first one.