लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : अवैध वाळू वाहतुकीच्या भरधाव वेगाने आणखी दोन तरुणांचे आयुष्य संपवले. करमाड-पिंप्रीराजा मार्गावरील मंगरूळ फाट्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अभिषेक पुनमचंद बिमरोट आणि अर्जुन काळुसिंग बिमरोट या दोन चुलत भावांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला प्रकाश बिमरोट गंभीर जखमी झाला आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
एकाच वेळी दोन घरांचे आधार हरपले!
या दुर्घटनेतील सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे मृत अभिषेक आणि अर्जुन हे दोघेही आपापल्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. एकाच अपघातात दोन्ही कुटुंबांतील एकुलते एक मुलगे हिरावले गेल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रविवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


No Comment! Be the first one.