अंबड तालुक्यातील शहापूर येथील घटना
लोकार्थ प्रतिनिधी पंकज पवार
अंबड तालुक्यातील शहापूर येथील चार शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला १० एकर ऊस शॉर्टसर्किट मुळे जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान घडली. यात शेतकऱ्यांचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शहापूर येथील शेतकरी संतोषकुमार काकडे यांचा गट नंबर ४२ मधील तीन एकर,सोमनाथ साळुंके यांचा गट नंबर ७१ मधील अडीच एकर ऊस,कैलास साळुंके यांचा गट नंबर ७० मधील अडीच एकर ऊस ,रामेश्वर साळुंके यांचा गट नंबर ७१ मधील दिड एकर ऊस असा एकूण दहा एकर ऊस जळून खाक झाला असून राधाबाई साळुंके यांचे अडीच एकरचे ठिबकही जळून खाक झाले आहे. आग विजवण्यासाठी अग्निशमन दल आले मात्र तो पर्यंत आगीत ऊस जळून खाक झाला होता.
महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे १० एकर ऊस जळून खाक झाला असून चार शेतकऱ्यांचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थिती अन् त्यात ऊस जळून खाक यात शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले आहे.
No Comment! Be the first one.