लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड – नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये! मंगळवारी सायंकाळी त्यांनी हदगाव तहसील कार्यालयाला अचानक भेट देत सर्व विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी भूविकास बँकेचा बोजा शासनाने माफ केलेला असतानाही शेतकऱ्यांना जुन्या फेरफार नकलांसाठी त्रास देऊ नये, तसेच वर्ग-२ जमिनींसाठी विनाकारण एनओसी मागू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी बँक व्यवस्थापकांना दिल्या.
यासंदर्भात १४ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अचानक पाहणीवेळी मनरेगाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (एपीओ) गैरहजर आढळल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार सय्यद उमर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No Comment! Be the first one.